
प्रथम तुज पाहता, जीव वेडावला ! 😍
तुमच्या आयुष्यात तुमच्या सवयी किंवा तुमचे छंद तुमची सदैव सोबत करत असतात. जिवंत माणसांकडून आपली अपेक्षा राहते की त्याने किंवा तिने कसं असावं किंवा कसं नसावं, कसं वागावं किंवा वागू नये…. काळानुरूप त्यांच्यात बदल झाले तरी तुमच्या मनातली त्यांची प्रतिमा बदलते. छंदांबद्दल असं होत नाही. तुम्ही त्यांना जोपासता, त्यामध्ये रममाण होऊन जाता… वयाच्या कुठल्याही टप्प्यावर त्यामध्ये बदल होत नाही. आणि त्यामुळेच ते सदैव जवळचे राहतात. मला वाचनाची किंवा गाणी ऐकण्याची/पाहण्याची सवय कधी लागली ते माहिती नाही पण हळूहळू ती वाढत गेली एवढं मात्र नक्की. माझ्या आजोबांच्या वाचनाच्या आणि त्यामधल्या आवडलेल्या ओळींना वहीमध्ये उतरवण्याच्या सवयीचा माझ्या मनावर नकळत प्रभाव पडत गेला असावा… कारण आवडलेल्या गाण्यांच्या दोन-चार ओळी मला फेसबुकवर पोस्ट करायची सवय कधी लागली कोण जाणे! पण तो वहीमधल्या परिच्छेदाचा प्रभाव असावा असं मला राहून राहून वाटतं. नेमक्या शब्दांत योग्य त्या भावना पोहोचवता येणं हे कसब आहे. शिवाय ते अशा लयीत असणाऱ्या ओळींत गवसलं की जाम भारी वाटतं. व्यक्तिगत आयुष्यात आपण असं स्वप्नात वावरल्यासारखं वागू, बोलू शकत नाही किंबहूना ते थोडं बालिश वाटतं. मात्र वाचताना त्यामधून क्षणिक अनुभवाची प्रचिती येते. त्या ओळींमधलं दुःख, वेदना, हुरहूर, त्यातला अवखळपणा, अल्लडपणा, निरागसता, चीड या आणि अशा इतर इमोशन्स आपण जगून येतो. आणि ते खूप प्रामाणिक आणि स्वतःपुरतं असतं. इतरांना सामान्य वाटतील अशादेखील ओळींमधे जेव्हा तुम्हांला अभिप्रेत असणारा अर्थ दिसतो ना तेव्हा मिळणारा आनंद आल्हाददायक असतो.
अशाच काही गाण्यांच्या, कवितेच्या किंवा गज़लेच्या ओळी उदाहरणादाखल सांगतो. सगळ्या ओळी कशा छान लयीत आहेत हे पण तितकेच महत्वाचे! (खरं तर या ओळीत मनात गुणगुणून पाहिल्या तर त्याची मजा द्विगुणित होईल.)




अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुलेना
मिटले तसेच ओठ की पाकळी हलेना !
रुसल्यावर बोलायचं म्हणजे हार पत्करल्यासारखंच नाही का होणार त्यापेक्षा👇 हे बरं नाही का? 😉



आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ








👇कधीतरी अपेक्षेपेक्षा वेगळंच घडू लागतं.. सावरण्याची धडपड सुरु असताना कसोटीचे क्षण येतात..!











काय एकेक भन्नाट उपमा सुचतात कवींना… 👇
👇 … थोडं हवापाण्याबद्दल … 👇



कुठे काहीतरी घडलं तर त्यावर लिहिल्या जाणं हे अगदीच प्रासंगिक वाटतं. त्यापेक्षा जे मनात आहे ते लिहिलं की बरं वाटतं. म्हणून हे सगळं..! आज हे मनात आलं म्हणून आजच्या ब्लॉगमध्ये उतरलं.. किंवा उतरवलं म्हणा हवं तर!
बरोब्बर चार दिवसांनी आषाढी एकादशी आहे. इथे विठूरायाच्या पंढरपूरला पालख्या येऊ लागल्या आहेत. सर्व वातावरण भक्तिमय झालंय. तर मग या ब्लॉगची सांगता संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील ओळींनी होण्याइतकं यथायोग्य दुसरं काय असणार!

आधीच दळलेलं आणून ओतलं आहे. ओरिजिनलची सर याला नसणार हे मान्य आहेच, पण “राजहंसाचे चालणे” इ.इ. मुळे माफ करावे ही विनंती. मनात आलेलं प्रामाणिकपणे सर्वांसमोर मांडलंय. वन हॅज टू रिस्क! कारण जगात काय अभिजात किंवा क्लासिक आहे ह्याची परिमाणं वेगवेगळी आहेत. नवीन काही लिहिलेलं नाहीये या ब्लॉगमधे. जुन्याच गोष्टींचा संग्रह आहे. त्यामुळे ह्या प्रकारचा ब्लॉग एक बाईटभरही आवडला नाही तर फार तर Not my cup of tea म्हणता येईल. (गडद काळ्याच्या कसल्या शेड्स बघायच्या ? ए क अ क्ष र क ळे ल त र श प थ ! )
आणि आवडलंच तर… किंवा ‘आक्शी मनातल लिवलय बगा तुमी’ असं वाटलं तर…? तर तेव्हा मात्र एकच करा…
पर्दा चाहे गिर जाए…..
पर तालियाँ बजती रहे…..
(कधी कधी काहीबाही लिहायला कौतुक हवंच असतं !) क्या बोलते भाई (और बहन) लोग ?
अलविदा! भेटू लवकरच! तोपर्यंत..
🙏🏼 बोला पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 🙏🏼
- राहुल.
- २४ जून २०२३.
Comments
Superb write up Rahul ❤️
Keep writing
प्रिय राहुल वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐🎂
वाढदिवस म्हटला की शुभेच्छा, केक,पार्टी,गिफ्ट याची रेलचेल असते आणि सोशल मीडियाच्या जगात तर शुभेच्छा चा वर्षाव च असतो.पण यातही तू तुझे वेगळेपण जपतोस स्वतः च्या मनीचे भाव blog च्या माध्यमातून प्रगट करतोस हे तुझे वेगळेपण मनाला खुप भावते.यावेळी कोणत्या नवीन विषयावर चिंतन वाचायला मिळणार याची उत्सुकता असते .आणि तू हे सातत्य जपलेस याचे कौतुक वाटते .एखादा संकल्प घेणे सोपे असते पण तो निभावणे कठीण ! तुझ्यातील या संकल्प सत्यात उतरवणाऱ्या वृत्तीला सलाम 🙏
वाढदिवसाला आत्मचिंतन करावे,मागील वर्षभरात काय नवीन मिळवले ,काय गमावले याचे सिंहावलोकन करून पुढील वाटचाल करावी असे म्हणतात . पण आत्मचिंतना पेक्षा तुझे मुक्त चिंतन मनाला भावते,विचाराला चालना देते,मलाही या निमित्त काहीतरी लिहण्याला प्रवृत्त करते
हेच तुझ्या शब्दांचे, भावनेचे सामर्थ्य
आहे,कौशल्य आहे .
“प्रथम तुज पाहता” शिर्षकातून उत्सुकता निर्माण झाली . चांगल्या सवयी ,छंद, यातून वैचारिक उंची, भावनांची संवेदनक्षमता विकसित करता येते याचे दर्शन झाले .शब्दांमधील लय पकडता आली की जीवनातील लय सापडते ,जीवन गाणे शब्दातून ,स्वरातून साकारते .नेमक्या शब्दातुन भावना पोहचवण्याचे कसब , त्याला लयबद्ध केलेले स्वररूपी गाणे आठवणे अन ते प्रसंगानुरूप post करणे ही तुझी कला वाखाणण्याजोगी आहे.👍त्यातून आनंदाची अनुभूती घेता येणे ही ईश्वरी देणं आहे तिला जप ,वृद्धिंगत कर !
मनातले भाव शब्दात उतरवणे खरच अवघड आहे तशी काव्य प्रतिभा,साहित्यिक दृष्टिकोन असणं महत्वाचे ! वाचनातून ही दृष्टी ,समृद्धी अनुभवता येते .गाणी जुनीच,शब्द दुसऱ्याचे ,चाल ही दुसऱ्याची पण ती पेश करण्याची तुझी अदा मनाला भावते😊तालिया तो बजती ही रहेगी भाई❤️👍
खुप छान👌असाच व्यक्त होत रहा हीच शुभेच्छा 💐