॥ श्रीगणेशा ॥

प्रत्येकाची व्यक्त होण्याची एक पद्धत असते. मी लिहून व्यक्त होतो. कोणी वाचेल न वाचेल यापेक्षा माझ्या मनात कधीतरी हे विचार येऊन गेले आणि मी ते लिहून काढले हे अधिक महत्वाचे…

“मी ज्या गोष्टी लिहावयाला बसलो आहे, त्या जगाने वाचाव्या म्हणून मुळीच नाही. मला जगाचा जो कडू-गोड अनुभव आला आहे तो टाचून ठेवावा आणि त्या अनुभवाने व्यतिथ झालेल्या अंत:करणातील दु:ख ओकुन हलके करावे या पलीकडे माझा दुसरा कसलाच हेतू नाही. अर्थात माझ्या जिव्हाळ्याच्या माणसांखेरीज दृष्टीस हे लिहिणे पडले तर चुकून लोकांच्या एकांतात प्रवेश केल्याबरोबर सभ्य मनुष्य ज्या तत्परतेने तेथून जातो, त्याच तत्परतेने त्याने हे बाजूस ठेवावे.”

                                                           -ज. श्री. डाळिंबे.

वरच्या ओळी माझ्या आजोबांनी लिहीलेल्या आहेत. माझी लिखाणाची प्रेरणा कदाचित त्यांच्यापासूनच सुरू होऊन माझ्या आईमार्फत मला मिळाली असावी. त्यांच्या आचारांसहित त्यांचे विचार अनुकरणीय व मार्गदर्शक आहेत आणि आईचे अक्षर सुवाच्च व सुंदर!

गेल्या २५ वर्षांपासून मी लिहावं असं खूप जणांना वाटत होतं. त्यांनी ते वेळोवेळी बोलून दाखवल्यामुळे आपण खरंच लिहावं का असा मनात विचार येऊ लागला आणि म्हणूनच हा लेखनप्रपंच! या ब्लॉग मध्ये काय लिहायचं हे अजून ठरवलेलं नाही. मनात जे येईल ‘टंकायचं’ असाच विचार आत्ता तरी आहे. मला आवडणाऱ्या गोष्टींबद्दलची माझी मांडणीच ह्या ब्लॉगमध्ये असणार आहे. नाहीतरी असं विशेष काही किंवा सामान्यांपेक्षा वेगळं काही माझ्या आयुष्यात घडलं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे कदाचित भावलेली गाणी, एखादी गझल वा  कविता, कुठले तरी फुला-पानांचे फोटो, चटका लावून गेलेली घटना, प्रसंग, व्यक्ती किंवा पुस्तक ह्यापैकीच काहीतरी वाचायला मिळेल. स्वतःचे जुने फोटो फडताळातून काढून नव्याने पहायला जो आनंद मिळतो तसा काहीसा अनुभव असेल माझ्यासाठी या ब्लॉगलिखाणाचा..!

इतरांना वाटतंय मी लिहावं या एकाच कारणास्तव लिहितोय असं नाही. कारण असं असतं तर कदाचित याआधीच लिहिलं असतं..  वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर लिहिण्यामागे छंद, विरंगुळा आणि स्वतःचं समाधान … बस्स एवढंच आहे. अर्थात हे म्हणजे उतारवयात लिहितात तसं आत्मचरित्र देखील नाही. But it’s my life and everything that touches it….!

Writing हे काही माझं profession नाही, work schedule मध्ये वेळ मिळाला की लिहितो. लिखाणात भाषेचं, विषयाचं बंधन  किंवा चौकट नाही. कधी, कुठे आणि कशा स्वरूपात लिहायचं याचा mental draft तयार न करता लिहायला लागतो. मधेच इंग्लिश किंवा हिंदी शब्द येतात. कधीकधी ते आणू वाटतात. अशी कुठली विशिष्ट writing style नाही. मुक्तछंदच आहे म्हणा ना! असं असूनही याला एक लय आहे. वाचताना काहींना बोलगाणी ऐकल्याचा भास होईल; काहींना प्रवास वाटेल. काही ओळी वाचताना ‘अरे, मला अगदी हेच म्हणायचं होतं!’ असं जर तुम्हाला वाटलं तरी आपल्या लहरी कुठंतरी match झाल्याचं समाधान वाटेल. लिखाणात नियमितता असेलच असे नाही. व्याकरण किंवा वाक्यरचना चुकली म्हणून मी न लिहिता बसू शकत नाही. एक sense of incompleteness येत राहतो. बरं आपल्यापुरतं लिहून गप्प बसावं ना तर मधेच जगाला दाखवायची खुमखुमी का यावी! लोकांकडून कौतुक करवून घ्यावं म्हणून? मला वाटतं की it’s a desire to share with the world what I have understood. …desire to let the world know my perspective. शेवटी लोकांनी उद्युक्त केलं म्हणूनच तर हा ब्लॉग लिहितोय नं! Writing gives me pleasure, so I let my fingers do tap dance. I love the feeling of euphoria I got at the end.

          •    “फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
          •      एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी”

संदीप खरे च्या अशा शहाण्या ओळींसारखी किंवा अगदी दोन-चार ओळींची कविता लिहिणाऱ्या कवी लोकांबद्दल खूप आश्चर्य किंबहुना कुतूहल वाटत बुवा! जे सांगायचं आहे ते नेमकं आणि थोडक्या शब्दांत मांडतात; शिवाय त्या कविता चालीत पण बसतात! ग्रेटच असतात बाबा हे कवी लोक! इमोशनल इंटेलिजंस बाबतीत ह्यांचा हात अर्रर्रर्रर्रर्र sorry – ह्यांची लेखणी कोणी धरू शकत नाही. असो. वाचनामुळे विचारांत येणारी समृध्दता लेखनामुळे परिपूर्ण होते असं म्हणतात. हा ब्लॉग म्हणजे ‘एक वर्तुळ आणि त्याला स्पर्शणारे टँजेन्टस’ असणार आहेत. शाळेत असताना एक दोन निबंध स्पर्धेचा नगण्य अनुभव (Participation Certificate मिळालं होतं की!!!) पाठीशी आहे – एवढ्याच शिदोरीवर या प्रवासाला सुरुवात करतोय. थोडक्यात म्हणजे सरड्याची धाव कुंपणापर्यंत! तेव्हा मंडळी… सांभाळून घ्या.

काही आवडलं तर जरूर सांगा कारण चांगल्या अभिप्रायाने उत्साह वाढतो. I do feel proud when people whom I respect appreciate my work.  आणि नाही आवडलं तर ते सुद्धा निदर्शनास आणून द्या, सुचना करा… आपका हुकुम हेड आईज पर!

Comments

Varsha
June 24, 2016 at 8:43 am

Bravo Rahul ?✌



Varsha
June 24, 2016 at 11:46 am

Bravo Rahul



Archana
June 24, 2016 at 1:58 pm

मस्तच ? … खुप शुभेच्छा ?



June 25, 2016 at 8:40 pm

very nice. keep it up.



Pramod
June 29, 2016 at 10:32 am

Well done bro
I knew about writing skill
I have letters you wrote to me while in pune. I’m delighted that will again get reading something beautiful from your pen.
Yes I do agree with your shrivastva Ganesh that it should be “muktachanda”
Again no need to say that our liking are similar in many subjects or aspects so again eagarly waiting for further reading
Keep it up & Wishing you best luck



    blogadmin
    July 1, 2016 at 4:11 pm

    Thank you Pramod. Much needed appreciation from a friend like you.
    …you still remember those old times! Nostalgic…Thank you once again.



Leave a Reply to Varsha Cancel reply

Your email address will not be published.