भय इथले संपत नाही… मज तुझी आठवण येते…

जिंकता जिंकता कधी, उगाचच हरावं लागतं..
कधी कधी,
पूर्ण संपूनही, थोडंसं तरी उरावं लागतं..!

एखाद्याच्या मृत्यूनंतर तो राहात असणाऱ्या वास्तूमध्ये भकास आणि उदास शांतता जाणवत राहते. त्याच्या असण्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते कि त्याचा मृत्यूदेखील आपल्या मनावर आरूढ होऊ शकत नाही. काळाच्या ओघात थोडा विसर पडतो परंतु एखाद्या घटनेने re-telecast सुरु होतं.

आज फक्त अन फक्त माझ्या बाबांबद्दल…. खरं तर आम्ही सगळेजण त्यांना आजोबा न म्हणता ‘मोठे बाबा’ असं म्हणायचो!

परवा ते गेले… कायमचे! त्यांच्या जाण्याचं दुःख त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाला झालं. किंबहुना प्रत्येकाचा ‘आधार’ संपला. Emotional Support संपला. त्यांना जाणणाऱ्या प्रत्येकाची व्यक्त आणि अव्यक्त श्रद्धांजली दिसून आली. घळाळणाऱ्या डोळ्यांपासून ते पापण्यांच्या कडांशी आलेले अश्रू थोपवणाऱ्या डोळ्यांतला शोक दिसून आला.

माझ्याबद्दल बोलायचं झालं तर He was my biggest support system. I shared an indefinable bond with Him. He knew me inside out. He was my counsellor who listens to me and guides me; my inspiration and even my motivation. I still couldn’t imagine my life without Him. आत्तादेखील त्यांच्याबद्दल past tense मधली क्रियापदं लिहिताना भरून येतंय. Its tough time for me. ‘आदर्श जगण्याचं मूर्तिमंत उदाहरणच’ गळून पडलंय. आता फक्त recovery journey!

हो. ‘आदर्श जीवन’……
कारण सामान्य माणसासारखा त्यांना देखील राग यायचा, चीड यायची, मतभिन्नता टोचायची… असं असूनसुध्दा हे वादळ कधीही दिशाहिन झालं नाही. त्यांच्या वागण्यातून किंवा वर्तणुकीतून त्यांनी नेहमीच परोपकार जपला… जे सामान्य माणसाला सहजी शक्य होत नाही. म्हणूनच ते अगदी ideal होते. बऱ्याचदा लोक डोक्यात राख घातल्यासारखे आसुरी वागतात तर कधीकधी स्वतःला संतपदी ठेवून इतरांशी उपदेशात्मक वागताना दिसतात. फ्रॅक्चर्ड मेंटॅलिटी झालीये लोकांची… साला माणसाला माणूस म्हणून जगताना पाहायला मिळणं दुर्मिळ झालंय!! अशामुळे तर माझ्या बाबांचं वागणं अजूनच अधोरेखीत होत राहतं. कारण त्यांचं वागणं हे जात, धर्म, वय, शिक्षण, घराणं, सांपत्तिक स्थिती वा इतर कोणतेही फॅक्टर पाहून बदलत नव्हतं! त्यांना माणूस इतका स्वच्छ वाचता येत असे कि दरवेळेस आश्चर्य वाटायचं.

शिक्षण उर्दूमध्ये झालेलं असूनदेखील मराठी, हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत भाषेतील किंवा आध्यात्मिक विषयातील साहित्याबद्दल त्यांना आदर होता आणि विशेष माहिती होती. सतत वाचन आणि त्याबद्दलचा अभ्यास होता. त्यांची प्रत्येक विषयातील जिज्ञासा, उत्सुकता आणि कुतूहल त्यांना परिपूर्ण बनवत गेली. त्यांच्या वागण्यात जी ‘परिपक्वता’ होती ती गेल्या ४० वर्षांत मला कोणाच्याही वागण्यात दिसून आली नाही. त्यांचं behavioral comfort समोरच्याला आपलंसं करायचं! त्यांच्याशी बोललं कि छान वाटायचं… स्मरणरंजन, आठवणी, गप्पा, वादविवाद यातून सतत बरंच काही मिळत असायचं. माहितीमध्ये, ज्ञानात भर पडायची… त्यांच्याशी बोलून हक्काचा आधार मिळायचा… दरवाजा सताड उघडून बाहेर जावं आणि तुफान येणारे थेंब तोंडावर घेऊन एकदम फ्रेश व्हावं तसं वाटायचं!

नेहेमीच्याच आयुष्यातल्या कल्पना पण वेगळ्या जाणिवेनं ते मांडत असल्यामुळेच असावं. ह्या थेंबांनी अजुनच तहान जागवली जायची. मनाला नवी उर्जा मिळायची. त्यांनी केलेलं कोडकौतुक खुप काही जिंकण्याच्या आत्मविश्वासाला बळ द्यायचं. त्यांचं वक्तृत्व सर्वस्पर्शी व संमोहक होतं. अत्यंत तर्कसंगत विचार, स्पष्ट दृष्टिकोन आणि ध्येयनिष्ठ आचारप्रणाली ही त्यांच्या जगण्याची काही वैशिष्ट्ये होती. त्यांचं वक्तृत्व, लेखन, हजरजबाबीपणा, व्यक्तिमत्त्व, ज्ञान या सगळ्याबद्दल मला आदर आहे. त्यांच्या लिखाणाबद्दल मी काय बोलावं? ते तर सुंदर सुरेख, अप्रतिमच…! पूर्वी नियमित पत्रव्यवहार असायचा त्यावेळी त्यांनी लिहिलेली पत्रं वाचणं हा खूप आनंददायी अनुभव असायचा. त्यातून स्फुर्ती, प्रेरणा मिळायची. माझ्या लिखाणात थोडीफार जर काही ‘वाचनीयता’ असेल, तर त्यासाठी मी बाबांचं ‘देणं’ लागतो.

ते खऱ्या अर्थी व्हर्सटाईल होते. काय नव्हतं त्यांच्याजवळ? Happiness, Hope, Humour and He Himself!

आयुष्याच्या पर्फोर्मन्सचा ग्राफ सरळ रेषेत वर जात नाही .. सतत खाली-वर होतो, त्यावेळी डोकं जागेवर ठेऊन समंजसपणे साथ देणारा जोडीदार असणे ही लग्नाची उपलब्धी असली पाहीजे. हा करार नसून समर्पण आहे. असे समर्पण करणारा जोडीदार असेल तरच लग्न यशस्वी होते. ते परस्पर समर्पण जितके अधिक तितके लग्न अधिक यशस्वी! रुप, पैसा, प्रतिष्ठा, नोकरी, मुले-बाळे, रुप या सार्‍या बाबी खरोखर अत्यंत गौण आहेत. माझ्या बाबांना मोठ्या आईची अशीच समंजस साथ मिळाली. (आजीला आम्ही मोठी आई असं म्हणतो.) त्या दोघांकडे पाहिल्यावर असं वाटायचं, काय तृप्त आहे त्यांचं वृद्धत्व ! गायीच्या दुधावरच्या सायीसारखे .. जाडसर आणि स्निग्ध !!

मात्र…
‘संध्याछाया जशी पसरत जाई .. कातरवेळी मन उदास होई..’

बाबा आजारी पडले तशी भीती जाणवू लागली. माझ्या आधाराची, आदर्शाची अशी अवस्था मनाला यातना देत होती. खरं तर ते त्यांचं आयुष्य पुरेपूर जगले. अगदी आनंदाने आणि कोणतेही वैष्यम्य न बाळगता. मात्र त्यांचं हे असं दिवसेंदिवस क्षीण होणं हे वेदना देणारं होतं. आणि एके दिवशी ते आम्हांला सोडून गेले!! रिकाम्या पलंगाकडे पाहिल्यावर काय वाटलं ते शब्दांत सांगूच शकत नाही. तेव्हाही नाही आणि आजदेखील नाही. डोळे मात्र तेव्हाही भरून आले होते आणि आजही येतात.

राग लोभ, अन खेद खंत हे, दिले घेतले इथेच ठेऊ
“तिथे” न लागे ह्यातील काही, आलो तैसे निघुन जाऊ

अफाट पैसा आणि कचकड्याची सुरक्षितता शोधताना आयुष्य जगायचे राहून जात आहे! अपेक्षांचे ओझे झुकारून आला क्षण जगण्याचा विवेक जो माझ्या बाबांनी जागृत ठेवला तो आमच्या जगण्यातदेखील राहावा हीच एक अपेक्षा !

– बाबांचा लाडका नातू,
राहुल

—^—

तुझेही पाय मातिचेच असतिल
याची जाणिव आधिच होती
म्हणुनच तुला वाहिलेली प्रत्येक ओंजळ
सुंदर फुलांची पण कागदिच होती !

Comments

Varsha
June 24, 2017 at 7:37 am

सुंदर लिहिले आहेस. Speechless.
Keep writing ?



सौ . रोहिणी हवेलीकर
June 24, 2017 at 7:51 am

किती मनातले लिहलेस रे ! डोळे भरून आले ! आज ही अंतःकरणात भय निर्माण झाले की दादांचा प्रेमळ, आश्वासक डोक्यावरून फिरणार हात आठवतो मन हलकं होऊन जात आज ही ते आपल्यात आहेत च की ! आपल्या सर्वांच्या अंतःकरणात,विचारात,कृतीत त्यांचे अस्तित्व सतत जाणवत राहते . आज विशेषत्वाने त्यांचे स्मरण करून दिलेस आणि स्मरण म्हणजे जीवन याची प्रचिती आली . खुप छान शब्दात तुझ्या आणि आमच्याही मनातील भावना व्यक्त केल्यास ??



    blogadmin
    June 24, 2017 at 11:19 am

    काय बोलू!!
    माझं प्रत्येक लिखाण बाबांनी वाचलं होतं. ते गेल्यानंतर मी ब्लॉग वर काही लिहावं असं मलाच फारसं वाटलं नाही. सुमारे वर्षभर हीच परिस्थिती होती. मनाच्या त्याच अवस्थेने लिखाण घडून आले. त्यांच्याविषयी लिहिलेलं ते आता वाचू शकणार नाहीत हीच खंत आहे. I am sure He is watching me from somewhere there. त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत सतत राहील हीच खात्री आपल्या कुटुंबाला प्रेरक असेल.



Leave a Reply to blogadmin Cancel reply

Your email address will not be published.