दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो.. तो जिंदा हो तुम

🙏 नमस्कार.. अस्सलाम अलैकुम.. सत श्री अकाल.. 🙏

तिसरी पोस्ट… तिसरा ब्लॉग… काहीही मनात नसताना लिहितोय.. अगदीच लिहायचं आहे म्हणून लिहितोय…
लिखाणात खंड पडलाय म्हणून लिहितोय…
कारण…
नको वाटलं लिहायला किंवा व्यक्त व्हायला…😷
व्यक्त होणाऱ्या लोकांची हल्ली सोशल मिडियावर सतत रेलचेल असते म्हणून नको वाटतं आपलं पण घोडं दामटायला!
खरं तर सभोवताली इतकं काही घडत असतं कि त्यामुळे चीड, संताप, आनंद, अपेक्षाभंग हे सर्व काही होत असतं.. आणि आपल्या कृतीशून्य व्यक्त होण्याने होणार तरी काय!

मात्र कधीतरी कोणाच्यातरी चार सुरेल ओळी कानावर येतात आणि आपोआप गुणगुणायला होतं.. किंवा अप्रतिम खेळाच्या जोरावर जिंकलेल्या मॅचेस पाहिल्यावर हातात आपसूक बॅटबॉल येते.. कागदावर चितारलेल्या सुरेख चित्राकडे किंवा अंगणातल्या मोहक रांगोळीकडे पाहिल्यानंतर लॅपटॉपचा वॉलपेपर किती सुरेख ठेवता येईल यासाठी गुगल केलं जातं… एखाद-दुसरा परिच्छेद वाचला कि त्या पुस्तकाचा फडशा पडला जातो.. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ मधे फरहान जसं म्हणतो ना कि ‘ये क्या हो रहा है यार.. she’s got me… खिंच रही है मुझे… she’s pulling me man’ …आपणही अगदी तसंच ओढल्या जातो.
हो! हे सारं अगदी शंभर टक्के माझ्याबाबतीत होतंच होतं! आणि याच पॉझिटीव्हिटीमुळे लिहावं वाटतं..

खूपच फॉर्मल किंवा सिरीयस होतंय का हे सगळं…😬
…नाहीतरी आपलं असं काही मोस्ट हॅपनिंग वगैरे लाईफ थोडंच आहे! त्यामुळे काय लिहिणार!
मनात खूप विषय आहेत कि ज्यावर लिहायचं आहे; लिहीन सुद्धा..
असा सलग दोन-तीन तासांचा वेळ हवाय स्वतःसाठी. जिथे कुठलाही डिस्टर्बन्स नकोय. मनातले विचार स्थिर होण्यासाठी..! तो सतत वाजणारा मोबाईल आणि सोशल साईट्सच्या नोटिफिकेशन्सचा गोंगाट नकोय… आणि हवाय स्वतःमध्ये थोडासा पेशन्स!
‘स्वतःसाठी’ – हे खूप महत्वाचं आहे.
मला काय आवडतंय यापेक्षा मला आवडलेलं इतरांना आवडेल का हे जाणून घेण्यातच हल्ली वेळ व्यर्थ होतोय. किंवा जे इतरांना आवडलं आहे ते आपल्याला आवडून घेण्याचा अट्टाहास सुरु आहे. इतका पगडा का आहे इतरांच्या मतांचा? कशी का असेना माझी आवड… मला ज्यातून आनंद मिळतोय ती गोष्ट करायला मन का धजावत नाही!
गाणं म्हणायला किंवा इन्स्ट्रुमेंट वाजवायला शिकायचंय, कॅलिग्राफी करायचीय, चित्रं काढायची आहेत, ओरिगामी शिकायचीय, water-sports, birdwatching, cricket, cooking, gardening, एखादा पाळीव प्राणी पाळायचाय, नवीन भाषा शिकायचीय असं बरंच काही करायचं बाकी आहे… अगदी पतंग उडवायचा राहिलाय! आणि यातली कुठलीही गोष्ट अगदी स्वतःच्या समाधानासाठी आणि शेवटापर्यंत शिकायचीय. माझं आळशीपणा वरचेवर वाढतच चाललाय आणि त्यासोबत माझ्या excuses ची यादी देखील!
कुठून तरी आणि कधीतरी सुरुवात करायलाच हवी!
बाकी ‘इन्सान का कर्तव्य होता है कोशीश करना… कामयाबी नाकामयाबी सब उसके हाथ में है’

अर्धवटच सोडतोय…singing the same tune…
पुन्हा भेटूच की.. अच्छा! ख़ुदा हाफ़िज़!

  • Rahul
  • JUNE 24, 2018.

Comments

Varsha
June 24, 2018 at 7:25 am

Lovely. Keep writing dear.
Wish you a very Happy Birthday



प्रकाश कुलकर्णी
June 24, 2018 at 8:02 am

सुंदर मनोगत 🌷✌️व्यक्त करत रहा .मन विकसीत होत जाईल कमळाप्रमाणे . समृद्ध होईल जीवन परिवाराचे .



Pravin Baraskar
June 24, 2018 at 9:00 am

Very Nice.



Saurabh
June 24, 2018 at 9:14 am

Hey Rahul da, beautifully written!
Wish you a very happy birthday!😊💐🎂



सौ .रोहिणी हवेलिकर
June 24, 2018 at 11:05 am

वा ! खुप छान राहुल .👍 असाच अभिव्यक्त हो ,अभिव्यक्ति एक कला आहे,आणि तुझी विचारधारा सुस्पष्ट ,अंतर्मुख करणारी असते.आणि लेखन ही एक कला आहे या माध्यामतुन अंत:करणातील संवेदनशील भावविश्व प्रकटत असते.आपण आपल्याच विषय करून कधी अभ्यासत नाही ,सातत्याने दुसऱ्या चाच विचार करतो,स्व कधी जोपासतच नाही .असा स्वतः साठी वेळ काढ़ खुप खुप लिह मला खुप आवडेल या निमित्ताने आमचेही चिंतन वाढेल ,प्रेरणा मिळेल .
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐🎂



    blogadmin
    June 24, 2018 at 11:33 pm

    Thank you Maushi. Always need appreciation from you.
    I miss Baba every time I pen down something.
    And Yes. Will surely find time write something. And thank you for the wishes.



Leave a Reply to blogadmin Cancel reply

Your email address will not be published.